Press "Enter" to skip to content

सोंडाई गडावर शिवजयंतीचं आयोजन

महिला पोलीस कु.प्रगती तुकाराम यादव हिचा शिवकार्य ट्रेकर्स वतीने सत्कार

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्ताने शिवकार्य ट्रेकर्स खालापूर विभाग व ग्रामस्थ मंडळ सोंडेवाडीवतीने किल्ले सोंडाई गडावर शिवजयंतीचं आयोजन करण्यात आले होते.

यावेळी खालापूर तालुक्यातील वरोसे गावातील कु.प्रगती तुकाराम यादव हिची नुकतीच मुबंई शहर पोलीसमध्ये निवड झाली त्याचबरोबर प्रगतीच्या घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असूनसुद्धा तिने मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे याच अनुषंगाने किल्ले सोंडाई गडावर शिवजयंतीच्या निमित्ताने शिवकार्य ट्रेकर्स वतीने तिला भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा शिवकार्यचे संस्थापक रोहिदास ठोंबरे सर यांच्याहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी किल्ले सोंडाई गडावर शिवमूर्तीचं पूजन व दुर्गपूजन करून भगवा फडकत जय भवानी, जय शिवाजी चा जयघोष करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवकार्यचं संस्थापक रोहिदास ठोंबरे, रसिका ठोंबरे, जितेंद्र कदम,संदीप जाधव,गौरव ठोंबरे,प्रतीक्षा ठोंबरे लहान दुर्गसेवक देवेन ठोंबरे,भूमी ठोंबरे तसेच राज भोईर, स्वप्नील पारगावकर, ओमकार आम्ले व सोंडेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.