जे.एम. म्हात्रे चॅरीटेबल सामाजिक संस्था व श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मोफत ई- श्रमकार्ड
सिटी बेल • पनवेल •
जे.एम. म्हात्रे चॅरीटेबल सामाजिक संस्था व श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने रिटघर येथे नागरिकांना मोफत ई- श्रमकार्ड बनविण्याचा कार्याचा शुभारंभ झाला.
पनवेल रिटघर येथे श्री सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक सुभाष भोपी आणि आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्रचे उपाध्यक्ष भारत भोपी या पिता- पुत्राच्या औदार्यातून आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांच्या माध्यमातून तसेच केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून रिटघर, दूंदरे, चिंचवली, शिवनसई आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्यां व आदिवासी बांधवांच्या भविष्यासाठी भारत सरकारच्या एका कल्याणकारी योजनेचं अर्थात ई-श्रमकार्ड बनवून देण्यात येणार आहे.
कार्ड बनवून घेणाऱ्या नागरिकांकडून कुठलाही मोबदला न घेता अगदी मोफत बनवून देण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सुभाष भोपी, राजेश केणी, भारत भोपी, नामदेव शेठ फडके, विलास फडके,(जि.प.सदस्य ), शेखर शेळके, देवा पाटील , वामणशेठ शेळके, महादेव गायकर, महादु पाटील, गुरूनाथ उसाटकर , दिलीप उलवेकर, अभयजी ठाकूर (ई-सेवा केंद्र चालक), बालाराम पाटील , बालाराम गवली, विष्णू शेळके ,मोहन भोपी, बालाराम फडके ,अनिल घरत (उरण तालुका सचिव आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था), विश्वास पाटील (नेरे विभाग अध्यक्ष मनसे), प्रदीप पाटील (नेरे-दूंदरे विभाग अध्यक्ष -आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था ), अंकुर पाटील शहर अध्यक्ष नवीन पनवेल – आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा .संस्था), झाकीरदादा काकर व सर्व सहकारी मंडळी आणि रिटघर,दूंदरे गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांच्या व महिला भगिनींच्यां उपस्थितीत आणि उदंड प्रतिसादात हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
ह्या मोफत ई-श्रमकार्ड बनवून देण्याच्या सत्कार्या मुळे या काबाड-कष्ट करणाऱ्या नागरिकांना आणि श्रमजीवी आदिवासी बांधवांना त्यांच्या भविष्यात त्यांना अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेता येईल. सोबतच अपघाती विमा पॉलिसीच्या माध्यमातून जर एखाद्या कार्डधारक नागरिकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाख रुपयांचा पिएमएसबीवाय विमा कव्हर मिळेल आणि एखाद्या कार्डधारकाला अंशतः अपंगत्व आल्यास त्या अपघातग्रस्त विमा धारकास एक लाख रुपायांचा विमा कव्हर मिळणार आहे.
Be First to Comment