Press "Enter" to skip to content

रेप्टाकोस कंपनीतून उदय थोरवे सन्मानाने सेवानिवृत्त

सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •

रोहे तालुक्यातील भातसई गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते व धाटाव औद्योगिक वसाहतीतील रेप्टाकोस ब्रीट अँड कंपनी या कंपनील उत्कृष्ट कामगार म्हणून विशेष नावलौकिक प्राप्त केले उदय थोरवे आपल्या कंपनी सेवाकाळातून वयोमानापरत्वे सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत.

त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ कंपनीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कंपनी व्यवस्थापन व कामगार वर्गाकडून यथोचित सन्मान करून भावपूर्ण निरोप देऊन आयुष्यातील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एक सेवाभावी कर्मचारी, मनमिळावू स्वभाव, हसरे व्यक्तिमत्व,सुख-दु:खात सहभागी होणारे व सामाजिक बांधिलकी जपणारे उदय थोरवे हे अष्टपैलू गुणांची खान असणारे कर्मचारी म्हणून त्यांची कंपनीत विशेष ओळख होती.त्यांनी आपल्या सेवाकाळात कंपनीने व कंपनी व्यवस्थापनाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचे प्रयत्न केले.

तर त्यांच्या भातसई येथील निवासस्थानीही आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार, आप्तस्वकीय व चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून शुभेच्छा दिल्या. यावेळी कंपनी व्यवस्थापक श्री.कुलकर्णी साहेब, खोत साहेब, गजानन बामणे साहेब, युनियन अध्यक्ष अशोक कोस्तेकर, कामगार प्रतिनिधी ठाकूर,बामुगडे, गोसावी, विशाल शेलार व मोठ्या संख्येने कामगारवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.