अशोक नगर किल्ला येथे विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा संपन्न
सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •
आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते अशोक नगर किल्ला,ता.रोहे येथे विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व रा.जि.पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या विषेश प्रयत्नातून,विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते जल जीवन नळ पाणीपुरवठा व समाज कल्याण विशेष घटक अंतर्गत जल शुद्धीकरण बसविणे व गाव अंतर्गत गटारात बांधणे आदी विकास कामांचे भूमीपूजन समारंभ संपन्न करण्यात आला.
यावेळी राष्ट्वादी काँग्रेस जि.कार्याध्यक्ष मधुकर पाटील,राज्य सरचिटणीस विजय मोरे,तालुकाआध्यक्ष विनोद पाशिलकर, तहसिलदार कविता जाधव,जि.सरचिटणीस सुरेश मगर,जि.उपाध्यक्ष शंकर भगत, तालुका उपाध्यक्ष अनिल भगत,जेष्ठ नेते प्रदीप बामुगडे,धाटाव उपसरपंच यशवंत रटाटे,विभागिय अध्यक्ष दत्ता चव्हाण,जेष्ठ नेते अप्पा देशमुख,तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंढे,प्रितम पाटील वरसे ग्रं पं सरपंच नरेश पाटील वाशी ग्र पं उपसरपंच अरविंद मगर,अमित मोहीते गुणाजी पोटफोडे आदी प्रमुख पाहुण्यांसह ,युवा नेते महेश बामुगडे, रूपेश बामुगडे,अजय बामुगडे दीनेश मोरे उपसरपंच राकेश बामुगडे, सदस्य ,दिपक जमदाडे, नरेश चांदोरकर, समिर वाळंज, माधुरी लोखंडे, सानिका मुंढे,जयवंती बामुगडे,यशवंत कडव,शिवाजी रटाटे, राकेश चांदोरकर सैरभ चांदोरकर प्रकाश चांदोरकर सुनिल जाधव सुदेश पालकर मुकेश चांदोरकर जेयश पुगावकर गैरव पाबरेकर संकेत पालकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ.अनिकेत तटकरे यांनी लांढर-धाटाव विभागाचे विकास कामासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध असून किल्ला अशोक नगर येथील समाजमंदिर सभागृह, अंतर्गत रस्ते तसेच अन्य विकासकामे लवकरच मार्गी लागतील असे अभिवचन दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा. पं.सदस्य नरेश चांदोरकर यांनी केले. तर सुत्रसंचलन नंदकुमार मरवडे यांनी केले.








Be First to Comment