वेलफेअर अँड एज्युकेशन ऑफ नवी मुंबई रेटील केमिस्ट आणि होलसेलर याच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन
सिटी बेल • कळंबोली •
पनवेल शहरासह गावागावात शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. संपुर्ण शहर व गावे भगवामय झाली होती. शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध लोक सेवेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वेलफेअर अँड एज्युकेशन ऑफ नवी मुंबई रेटील केमिस्ट आणि होलसेलर याच्या संकल्पनेतून ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदात्यानी रक्तदान केली. या रक्तदान शिबिराला पालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी भेट दिली. या कार्यक्रमात नगरसेवक गोपाळ भगत, रवींद्र भगत, शिवसेना पदाधिकारी कृष्णा कदम यादिसह अनेकांनी सहभाग घेतला.

पनवेल महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती, नगरसेवक यांनी शिवाजी महाराज जयंती निमित्त दोन दिवसांचे ई श्रम महानोंदनी अभियान सुरू करण्यात आले आहे.सर्व असंघटित कामगारांसाठी भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस असंघटित कामगाराना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तोंडरे गावात शिवरायांची वेशभूषा परिधान करून भव्य मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत शिवसेना पनवेल विधानसभा अध्यक्ष दीपक निकम यांनी आवर्जून उपस्थिती दाखविली.








Be First to Comment