शिवजयंतीनिमित्त माणुसकी प्रतिष्ठानकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र तसेच शिवजयंती मंडळ व ग्रामस्थ मंडळ महान यांच्या संयुक्त विद्यमाने महान गावात समाज मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधे देण्यात आली.
यावेळी डॉ. राजाराम हुलवान, डॉ. प्रज्योत पाटील, सतीश कणसे, भूषण जंजिरकर, संजय काळेल, शिवतेज कणसे हे माणुसकी टीम कडून उपस्थित होते. या कार्यक्रमात महान गावातील छोट्या छोट्या मुलांनी शिवरायांबद्दल ची महती सांगितली व श्लोक कांबळे, शिवतेज कणसे यांनी गारद बोलून सर्वांचा उत्साह वाढविला, या शिबिरामध्ये 70 हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला. माणुसकी प्रतिष्ठान नेहमी नवनवीन सामाजिक कार्यक्रम राबवत असते परंतु आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून तसेच त्यांचे कार्याची अंमलबजावणी कशी करता येईल याचा विचार करून आज एक गरजुवंत ठिकाणी जाऊन मोफत आरोग्य तपासणी केले.
ज्या गावापासून दवाखाने कमीत कमी पाच सहा किलोमीटर दूर अंतरावर आहेत अशा ठिकाणी जाऊन आरोग्य तपासणी करणे हे खरोखर प्रशंसनीय आहे. माणुसकी प्रतिष्ठान च्या गरजू व गरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो उद्देश आहे तो महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणीतला भाग आहे. डॉ. राजाराम हुलवान यांनी नुसत्या मिरवणुका किंवा ढोलताशे वाजवून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा महाराजांनी सांगितलेल्या सामाजिक कार्याचे अनुकरण करावे, तसेच लहान मुलांनी यात सहभागी व्हावे असे सांगत चांगल्या आरोग्याविषयी माहिती सांगितली.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महान चे शिक्षक सचिन कांबळे यांनी उत्तमरित्या पार पाडत सर्वांचे आभार मानत , आजची शिवजयंती साजरी करण्यात आली.








Be First to Comment