राजकीय पक्षांनी माथेरानची रुग्णवाहिका बनवलीय वडाप : धडधाकट माणसांच्या प्रवासासाठी होतोय वापर
सिटी बेल • मुकुंद रांजाणे • माथेरान •
रुग्णांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध असावी याकामी पंधरा वर्षांपूर्वी लोकांच्या आग्रहास्तव माथेरान या नगरीत मोटार वाहनांना बंदी असताना सुध्दा केवळ रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात आली होती परंतु रुग्णांना सेवा देण्याऐवजी येथील काही पक्षाच्या मंडळींनी या गाडीचा एखाद्या वडाप प्रमाणे राजरोसपणे वापर सुरू केला आहे.
दिवसभर या गाडीच्या फेऱ्या सुरू असतात याचा हिशोब सुध्दा दिला जात नसल्याने जे जे कर्मचारी असोत की अधिकारी याचा आर्थिक मोबदला परस्पर लाटत असल्याचे बोलले जात आहे.आणि ठराविक लोकप्रतिनिधींनी अनाठायी वापर सुरू केल्याचे दिसून येत आहे.खासदार बारणे यांच्या खासदार निधीतून तीन वर्षापूर्वी दिलेली रुग्णवाहिका काही चालकांच्या मनमानी मुळे डबघाईला आलेली आहे.
दस्तुरी ते माथेरान दरम्यान 300 रुपये आकारले जातात.दिवसभरात सध्यातरी वीस पेक्षाही अधिक फेऱ्या ही गाडी मारत असते परंतु आजतागायत ह्या गाडीची सेवा तोट्यात दाखवली जात आहे. या गाडीशी संबंधीत मंडळी आर्थिक लाभ घेत आहेत आणि सर्रासपणे वापर सुध्दा करीत आहेत. मागील काळात वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. ज्यांना रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही ती मंडळी संबंधीत लोकप्रतिनिधींचे लागेबांधे असल्याने मूग गिळून गप्प बसले आहेत.
रुग्णवाहीका या नावातच ती रुग्णांसाठी आहे हे सर्वांना माहीत असुनदेखील धडधाकट माणस तीचा वापर करतात. हे अस का होतं ? ते रुग्ण कसे ? हा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु आपल्याकडे रुग्णांच्या एका वर्गाकडे दुर्लक्ष करतो. रुग्णांचा तो वर्ग म्हणजे ‘मनोरुग्ण’! हे जे रुग्णवाहीकेचा वापर सत्तेच्या माजातुन करतात, ते मनोरुग्णच असणार. त्याशिवाय का कोणी रुग्णवाहीका वापरण्यात धन्यता आणि भुषण मानतील. परवा तर अक्षरश: ८० फेर्या मारुन या रुग्णवाहीका खिळखिळ्या झाल्यात. इमर्जन्सीला रुग्णवाहीका नादुरुस्त असल्यामुळे, ती उपलब्ध न झाल्यामुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागलेत हे माहीत असुनदेखील दांडगाईच्या जोरावर, आम्ही या गावात काहीही करु शकतो ही मिजास सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळच आहे. दुर्दैव हे की ज्या जनतेसाठी ही सेवा आहे त्यांना जोपर्यंत स्वत:वर वेळ येत नाही तोपर्यंत काही सोयरसुतक नाही. ज्याप्रकारे मागील दोन दिवस ॲम्बुलन्सचा अनिर्बंध वापर झाला त्याचा निषेध ! अत्यंत लाजीरवाणा प्रकार आहे
– मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष








Be First to Comment