Press "Enter" to skip to content

मालसई ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे उद्घाटन

धामणसई  पंचक्रोशीत  विकासकामाला गती मिळणार : आमदार अनिकेत तटकरे   

सिटी बेल • कोलाड नाका • शरद जाधव •                   

रोहा तालुक्यातील धामणसई  पंचक्रोशीत राष्ट्रवादि पक्षाच्या व खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार असल्याचे वक्तव्य आमदार अनिकेत तटकरे यांनी केले

               

मालसई ग्रामपंच्यायत हद्दीतील मुठवली खुर्द  येथील स्मशानभुमी  व निवारा शेड तसेच मालसई येथील साकव, सांगडे बौद्ध विहार शेड ,अशा विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.               

या भागाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे आजही हा वारसा समर्थपणे सांभाळाला जात आहे रोहा शहराला लागुन गावे असुन पाहिजे तेवढा विकास झाल नाही पेन मतदार संघाला गावे जोडल्या मुळे विकास काय हे येथील लोकाना माहीतच नाही.झाले ते गेले  आज येथील तरुणाई माझावर जिवापाड प्रेम करते त्याच पध्दतीत त्यांचीही मने जपून त्याना प्रेम देणार आहे यापुढे भविष्यात विकासाच्या बाबतीत  या भागाला मागे वळून पहायची वेळ येणार नाही असा ठाम विश्वास अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला.                      

यावेळी व्यासपिठावर तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर,  प्रदेश सरचिटणीस विजय मोरे,  विभाग अध्यक्ष अनंता शेट देशमुख, यूवक अध्यक्ष जयवंत मुंडे, सरपंच रसिका मालुसरे, चिंतामणी खांडेकर, मयुर खैरे, गौरव सुर्वे, घनश्याम कराले, हेमंत कडव,  प्रसाद देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.                  

यावेळी मुठवली खुर्द येथील भवानी माता मंदीरा समोर प्लेवर ब्लॉक तसेच भैरवनाथ मंदीरा करिता सात लाख रुपयाचा निधी देण्याचे अनिकेत तटकरे यांनी अश्वासन दिले. तर यावेळी मुठवली स्मशानभूमी चे काम दर्जेदार केल्याने राष्ट्रवादी खंदे समर्थक मारुती शेट तुपकर यांचे अनिकेत तटकरेंनी कौतुक केले‌.  यावेळी या गावातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत महेश तुपकर यांच्या आग्रहाखातर त्यांच्या घरी स्नेह भोजना चा आस्वाद घेतला.            

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुठवली ग्रामस्थ व महिला मंडळ व तरुण मंडळ यांनी अथक मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.