Press "Enter" to skip to content

मैदान खेळाडूंचे की तळीरामांचे ?

अलीबाग क्रीडा भवनाच्या मैदानावर दारूच्या बाटल्यांचा पूर

सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •

अलिबाग समुद्र किनार्याच्या जवळ असलेल्या क्रीडा भवन मैदान तसे तर अलिबागला मोठे मैदान आहे. याठिकाणी एरवी समुद्र किनाऱ्यावर येणारे पर्यटक गाड्या पार्क करत असतात. मात्र सध्या येथे क्रिकेटच्या स्पर्धा भरणार असल्याने याठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी इतर प्लस्टिक कचऱ्यासोबत येथे मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्याने मैदान खेळाडूंचे कि तळीरामांचे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेही शहरात मैदान असणे हे सुबत्तेचे लक्षण आहे. कारण क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुण बाहेर उभारून येण्यासाठी मैदान गरजेचे आहे. अशात अलिबाग शहरात नव्याने नगरपरिषदेचे मैदान तयार करण्यात येत आहे. तर शहराच्या महत्वाच्या ठिकाणी क्रीडाभवनाचे मोठे मैदान आहे. याठिकाणी देखील क्रीडापटूंना सराव करीत असतात. तर समुद्रकिनाऱ्याजवळ असल्याने येथे एरवी पर्यटकांची वाहने पार्किंग होत असतात.

अशात सध्या येथ क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येणार असल्याने मैदानाची स्वछता नगरपालिकेकडून करण्यात आली. जवळपास १० स्वच्छता कर्मचारी लावून येथील स्वच्छता करण्यात आली. त्यावेळी प्लास्टिक कचऱ्यापेक्षा दारूच्या बाटल्यांचा येथे मोठा खच आढळून आला आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात अलिबाग समुद्र किनाऱ्याला भेट द्यायला येत असतात.

पर्यटन व्यवसाय यामुळे होत असून येथील तळीरामांचा बेफामपणा हा पर्यटनाला गालबोट लावणारा आहे. पर्यटक असा बेफामपणा करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील तळीराम यांचा बंदो नगरपरिषदेने किंवा क्रीडा भवन संस्थेने करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक व्यक्त करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.