Press "Enter" to skip to content

वहाळ येथे शिव जन्मोत्सव व भव्य शोभा यात्रेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूनचं नवरदेव चढला बोहल्यावर

सिटी बेल • उरण • सुनिल ठाकूर •

वहाळगावात ग्रामपंचायत वहाळ, रायगड जिल्हा परिषद शाळा वहाळ,कर्नाळा हायस्कूल वहाळ तसेच वहाळ ग्रामस्थ मंडळी आणि वहाळ पंचक्रोशीतील शिवप्रेमी व ह.भ.प.प्रल्हाद महाराज वहाळकर भजन मंडळी यांच्या वतीने आज श्री. छत्रपती शिवरायांची भव्य शोभायात्रा काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी गावच्या प्रवेशमार्गावर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन गावचे जेष्ठनेते विश्वनाथशेठ पाटील, शेकाप चे माजी तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, आणि नवरदेव चि.जयेश मोहन घरत याांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीती चे संचालक राजेंद्र महादेव पाटील यांनी शिवरायांबद्दल थोडक्यात पण महात्वाची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

माहिती देत असताना साहेबांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी तानाजी चित्रपट १५० विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह दाखवला होता तसेच यावेळी देखील नवीन प्रदर्शित झालेला पावनखिंड(बाजीप्रभू)हा २०० विद्यार्थ्याना शिक्षकांसह दाखवण्याचे घोषित केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.