Press "Enter" to skip to content

नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

सिटी बेल • नागोठणे • याकुब सय्यद •

नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन विद्यासंकुलातील सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे छान आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी,जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देऊन संपूर्ण कॉलेज परिसर अगदी दणाणून सोडला होता.

यावेळी शैक्षणिक संस्थेच्या वतीने भारतीय एज्युकेशन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांचा पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या मंगलमय कार्यक्रमाला उपस्थित विद्यासंकुलाचे प्राध्यापक प्रवीण भारती,कार्यालयिन व्यवस्थापक वैभव नांदगावकर,सिव्हिल इंजिनिअर व्यवस्थापक रुपेश थले, कॉम्पुटर इंजिनियर व्यवस्थापक आशिष वाळंज, स्वप्नील पाटील,सुनील दरडे, आश्लेषा शिंदे,प्राची लिमये, शामल शिंगणकर, मेकॅनिकल इंजिनिअर व्यवस्थापक सुजित पाटील तसेच सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.