Press "Enter" to skip to content

नगरपंचायत पोलादपूरचे कार्यालय कुलूपबंद

छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी लावला दरवाजालाच शिवजयंतीनिमित्त पुष्पहार

सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •

नगरपंचायत पोलादपूरचे कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी खुले असेल, अशी अपेक्षा करून काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सकाळी साडेदहा वाजता पुष्पहार घेऊन कार्यालयाकडे गेले असता त्यांना नगरपंचायत पोलादपूरचे कार्यालये कुलूपबंद असल्याचे आढळून आले.

याप्रसंगी नगरसेविका आशा गायकवाड, नगरसेवक स्वप्नील भुवड, स्वीकृत नगरसेवक संतोष चव्हाण यांनी कार्यालयाच्या कुलूपबंद दरवाजालाच पुष्पहार अर्पण केला. यावेळी नगरसेवक स्वप्निल भुवड यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. याप्रसंगी ऍड. सचिन गायकवाड, काँग्रेस शहराध्यक्ष अमोल भुवड उपस्थित होते.

याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम उपनगराध्यक्ष नागेश पवार यांच्याहस्ते व नगरपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आटोपून सत्ताधारी नगरसेवक निघून गेल्याचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.