Press "Enter" to skip to content

पी.डी.जी.पी.क्रिकेट ट्रॉफी चे अनावरण संपन्न

पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसणर आयोजित क्रिकेट सामने

सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी •

क्रिकेट मुळे सांघिक भावना टिकवल्या जातात,या मुळे मैत्री घट्ट होते ,आपण या परिसरातील सर्व एकत्र येऊन पनवेल उरण डॉक्टर फेडरेशन ची स्थापना करावी या मुळे तुमची ताकद वाढेल आणि पुढील काळात येणाऱ्या समस्या समर्थपणे सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल असे डॉ,गिरीश गुणे यांनी सांगितले. ते पनवेल येथे पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसणर आयोजित क्रिकेट सामन्याच्या ट्रॉफी च्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,डॉ.विकास डोळे, पी.डी.जी.पी चे अध्यक्ष डॉ.वैभव मोकल,सचिव डॉ. रवींद्र राऊत,उपाध्यक्ष डॉ.सागर चौधरी, खजिनदार डॉ.संदेश बहाडकर डॉ.सागर ठाकूर,डॉ. सिद्धार्थ कौशिक,डॉ.सचिन पाटील,डॉ. सुदर्शन मेंटकर, डॉ. सौ अनघा चौहान,डॉ सौ. सोनल शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी प्रितम म्हात्रे यांनी सांगितले, आपण सर्वांनी कोरोनाचा प्रभाव असताना खूप मेहनत घेतली याचा अभिमान आहे.आम्ही आपल्यासोबत आहोत.

या वेळी प्रत्येक संघाचे कर्णधार उपस्थित होते या मध्ये (पुरुष संघ) तळोजा टायगर्स, उलवे युनायटेड,पनवेल वारीयर्स , खांदा कॉलोनी ,करंजाडे लायन्स,कामोठे दबंग,खारघर फोनिक्स,खारघर वारीयर्स, पनवेल स्ट्रायकर्स ,कर्नाळा वारीयर्स, आणि (महिला संघ) पनवेल रेंजर्स, पनवेल स्ट्रायकर्स,रसायनी लायन्स,कर्जत अथेना वारीयर्स,रोहा रॉयल्स,आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ वैभव मोकल यांनी सांगितले सात वर्षांपूर्वी रोपटे लावलेले आज झाड झाले आहे .सूत्रसंचालन डॉ गजेंद्र सिळीमकर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.