बी.बी बांठिया ज्वेलर्स चे वेडींग कलेक्शन दागीने परीधान करून सुपर माॅडेल्स करणार “सप्तपदी”
येत्या २७ फेब्रुवारीला विरुपक्ष हॉल पनवेल येथे होणार “रॅमवॉक” : रायगड जिल्ह्यात प्रथमच ज्वेलरी फॅशन शो
पहा बांठीया ज्वेलर्स ची संपूर्ण पत्रकार परिषद 👇👇
सिटी बेल • पनवेल •
पनवेलमधील सुप्रसिद्ध सुवर्णकार आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी बी बी बांठिया ज्वेलर्स यांच्या वतीने ‘सप्तपदी’ वेडिंग ज्वेलरी कलेक्शन लवकरच लॉंच करण्यात येणार असल्याची माहिती बांठिया ज्वेलर्स समूहाचे संचालक राजेश बांठिया यांनी प्रसिद्धी माध्यमांना पत्रकार परिषदेत दिली. रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पनवेल शहरातील विरुपाक्ष हॉल मध्ये भव्य दिव्य स्वरूपात या ज्वेलरी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे.
७ पिढ्यांच्या दागिन्यांची हौस भागवणारे बी बी बांठिया ज्वेलर्स हे रायगड जिल्ह्यात खात्रीशीर दागिन्यांचे व्यापारी म्हणून सुपरिचित आहेत. रायगड जिल्ह्यात प्रथमच या प्रकारच्या ज्वेलरी फॅशन शो चे आयोजन होत आहे त्यामुळे पनवेल, उरण सह नवी मुंबई व रायगड परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसुन येत आहे.
हल्लीच्या जमान्यात ग्राहक चोखंदळ झाला असून पूर्वीसारखे कॅटलॉग बघून दागिन्यांची खरेदी होत नाही. ग्राहकांनी हटके आणि निरनिराळ्या पद्धतीची डिझाईन्स डोळ्यासमोर पाहायला आवडतात. ग्राहकांची हीच गरज ध्यानात ठेऊन बांठीया ज्वेलर्स यांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने भारतातील निरनिराळ्या ठिकाणी प्रसिद्ध असलेली वेडिंग डिझाईन्स तयार केली आहेत. ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. या बरोबर बी बी बांठिया समूह ‘जेम्स ऑफ पनवेल’ या पुरस्काराने काही मान्यवरांना सन्मानीत करणार आहेत.

या ज्वेलरी फॅशन शो चे नियोजन अथर्व मीडिया वर्ल्ड चे सर्वेसर्वा मिलिंद राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असून प्रसिद्ध फॅशन शो दिग्दर्शक यश शेलार हे फॅशन शो साठी दिग्दर्शन करणार आहेत. तसेच या दागिन्यांची घडणावळ ज्वेलरी कन्सल्टंट नवीन सदारंगानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक निर्बंध अद्यापही काही प्रमाणात लागू असल्याने मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे, त्यासाठी प्रवेशिका बांठिया समूहाकडून वितरित करण्यात येतील. असे असले तरीही तमाम जनतेला सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस बी बी बांठीया ज्वेलर्स चे राजेश बांठीया,गौरव बांठीया,वैभव बांठीया, सुयोग बांठीया, अथर्व मीडिया वर्ल्ड चे मिलिंद राणे उपस्थित होते.








Be First to Comment