Press "Enter" to skip to content

स्वच्छ गाव निर्मल गाव संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी पुढाकार

4 लाईफ कंपनीच्या माध्यमातून सावा वॉटर पुरीफाय बॅग वाटप

सिटी बेल • उरण •

सारडे विकास मंच,साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सुयश क्लासेस आवरे यांच्या आयोजनातुन 4 लाईफ कंपनी तर्फे मोफत सावा वॉटर फुरिफाय बॅगच वाटप आज अनेक मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

ज्या समाज्यात आपण जन्मास आलो त्या समाजाच देणं आहे या भावनेने ज्या प्रमाणे माणसाचं आरोग्य हे खूप महत्वाचं मानल जात 80 टक्के रोग हे WHO रिपोर्ट नुसार हे पाण्यापासून उदभवत असतात आणि हे लक्षात घेऊन गावातील नागरिकांना 4 लाईफ कंपनीच्या माध्यमातून सावा वॉटर पुरीफाय बॅग वाटप करण्याचं कार्य सुरू केले आहे. ही बॅग सूर्याच्या किरणावर म्हणजे सौर ऊर्जे वर चालणारी आहे. याची क्षमता चार लिटर एवढी आहे. प्रथमच उरण मधे सारडे,कोप्रोली,पाले,आवरे,वशेणी आसे 100 नागरिक ज्यांनी या फॉर्म भरला होता आश्या नागरिकास ह्या बॅग चे वाटप करण्यात आले.

सोलर वर चालणारि आणि 4 लिटर मर्यादा असणारी ही बॅग मोफत कंपनी वाटप करीत आसताना जरी ही बॅग मोफत दिली जात असली तरी प्रेतेक नागरिकांना एक आव्हान केले होते किंबहूना जे फॉर्म भरले जात होते आश्या फॉर्म मध्ये एक अशी अट टाकण्यात आली होती की ज्यांना ह्या बॅग हव्या असतील आश्यानी आपल्या घरातील आणि परिसरातिल प्लस्टिक जमा करून या कंपनीला देणं आहे. कंपनीच्या या अटींचे कारण असं की आरोग्य चांगले होईल परंतु आपल्या धरती मातेचे आरोग्य सुद्धा सुधारेल यासाठी अनोख्या संकल्पनेत या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात 4 लाईफ कंपनी चे मुख्य शमीदर कोचर, संतोष खंडागळे, सौ जयश्री खंडागळे, निर्भय म्हात्रे, उदयोगपती अजित पाटील, शशिकांत पाटील, प्रसाद पाटील, दिनेश गाताडी, पत्रकार सुभाष कडू, पंकज ठाकूर, विवेकानंद म्हात्रें ,अशोक पाटील,लता राजपूत मॅडम, सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश पाटील, प्रशांत म्हात्रें, नरेश गावंड ,सुफळ आहार चे शिवकुमार म्हात्रें,त्रिजन म्हात्रें,सौ स्वाती ताई पाटील, वशेणी ग्रा प सदस्य शोभा पाटील, प्रथम शिक्षण संस्थेचे रणिता, हेंमाली मॅडम,सुरज ठाकूर,सारडे विकास मंच चे सह सचिव मंगेश पाटील, त्रिजन पाटील, CHA संघटनेचे हरिष म्हात्रें, अल्पेश जोशी, दूषण ठाकूर, समालोचक प्रविण ठाकूर,आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी निवास गावंड सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर निर्भय म्हात्रे यांनी आपलं सुंदर मनोगत व्यक्त करत सारडे विकास मंच सोबत 4 लाईफ आणि मान्यवरांचे आभार मानले. सोबत हेमाली मॅडम यांनी वसुंधरे ची सेवा करण्याची खरी गरज आहे आणि ती कुणी एकाने न करता प्रेतेकांनी करायला हवी असे आवाहन केले.

शशिकांत पाटील यांनी सारडे विकास मंच ला शुभेच्छा देऊन उरण मधील हा पहिला आसा कार्यक्रम आहे असे मत व्यक्त केले, लाईफ 4 च्या शमीदर खोचर यांनी ही बॅग कशी वापरावी याचे प्रत्येशित करून दाखवून बॅग चे फायदे आणि त्याची सविस्तर माहीती दिली. उपस्थित नागरिकांनी अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन केल. शेवटी साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.