पेण शहरामध्ये जया एकादशीच्या निमित्ताने जलसंवर्धन दिंडी
सिटी बेल • पेण • धम्मशील सावंत •
रायगड जिल्ह्यातील पेण शहरामध्ये जया एकादशीच्या निमित्ताने जलसंवर्धन दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये भोगावती नदीचे संवर्धन, पाण्याची बचत, नदीमध्ये कचरा टाकू नये, नद्यांची स्वच्छता, जास्तीत जास्त झाडे लावून पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवा, परिसर स्वच्छता, पाण्याचे पुनर्भरण याविषयी घोषवाक्य द्वारा संदेश देण्यात आले.


आज अनेक नद्या गाळाने भरलेल्या आहेत. कचऱ्याने भरलेले आहेत. नद्या उथळ झालेल्या आहेत. नदीचा गटार होतोय की काय अशी अवस्था झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी नदीचे महत्व लक्षात घेऊन ” जल है तो जीवन है “ हे लक्षात घेऊन समाजातील सर्व महानुभावांनी जल स्वच्छता या कार्यामध्ये स्वतःहून सहभागी होणे गरजेचे आहे. असे आवाहन करण्यात आले.


या दिंडीचे आयोजन संत सेवा मंडळ पेण, जल वारकरी, समाज संस्था, सार्वजनिक विद्यामंदिर मधील एन एस एस विद्यार्थी ,पेण नगर परिषद यांच्यामार्फत ही दिंडी घेण्यात आली. या जलदिंडी मध्ये गुरुवर्य दिगंबर महाराज, संत सेवा मंडळ अध्यक्ष शंकर मानकवळे, संदीप म्हात्रे, प्रा. संदेश मोरे, प्रा.उदय मानकवळे, महादेव बेलकडे, कृष्णा महाराज, कनिका मानकवळे आदी वारकरी संप्रदायाचे वारकरी सामील झाले होते.








Be First to Comment