सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदाय संचलित,अखंड हरिनाम उत्सव वर्षे ३६ विठ्ठल रखुमाई मंदिर निगडोली येथे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. मारुती ( दादा ) महाराज राणे ( हलीवली कर्जत)ह.भ.प. पांडुरंग महाराज पाटील ( निगडोली यांच्या आशीर्वादानेव मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायन आयोजन करण्यात आले होते.
निगडोली येथिल ग्रामस्थ एकत्र येवून अखंड हरीनाम सप्ताह हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावने साजरा करण्यात येत होता.मात्र या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दीपोत्सव च्या माध्यमातून सांगता करण्यात आली.
यावेळी सामाजिक,सांस्कृतीक,शैक्षणिक, राजकिय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि वारकरी संप्रदाय येथील थोर कीर्तनकार यांच्या माध्यमातून दीप प्रज्योलीत करण्यात आला.यावेळी उपस्थितानी आपले मनोगत व्यक्त केले.आणी दीपोत्सव प्रज्योलीत करून आणि ज्ञानेश्वराच्या पसायदानाने या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.गेले सात दिवस अखंड भजन,क़िर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी चैतन्य निर्माण झाले.
दीपोत्सव दिवशी गावातून भव्य – दिव्य दिवशी पायी पाळखी दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजन कमिटी – रामदास विठ्ठल पाटील,बबन चिमा फराट,संतोष धर्मा शिंदे,रामकृष्ण अनंत पाटील,मनोहर सावळाराम पाटील,तसेच सप्ताह कमिटी – नारायण पाटील,शुभाष पवार,हनुमंत फराट,किशोर फराट,वाल्मिक पाटील,पंढरीनाथ ठोंबरे,चंद्रकांत मुंढे तसेच
काल्याचा महाप्रसाद काशिनाथ जांभळे,( जांभिवली तेजेश पाटील ( निगडोली ) कल्पेश सुर्वे नडोदे पाणी व्यवस्था आर. एन. कंस्ट्रक्शन माडप काल्याके किर्तन भाई महाराज पाटील खोपोली यांच्या माध्यमातून करुन या सप्ताहाची सांगता करण्यात आली.
Be First to Comment