Press "Enter" to skip to content

तुपगावात पेंढ्याचे भारे जळून खाक

पेंढ्याचे दोन हजार भारे अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक जाळल्याची घटना

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

चौक तुपगावातील तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव यांच्या शेतात ठेवलेल्या पेंढ्याचे दोन हजार भारे अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक जाळल्याची घटना घडली .

तुपगावातील शंकर मंदिरनजीक योगेश गुरव यांनी शेतात पेंढा ठेवला होता . पंधरा गुरांसाठी वैरण म्हणून पेंढ्याची बेगमी गुरव कुटुंबानी केली होती. सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेंढा पेटवून दिला . गुरव यांनी शेताकडे धाव घेतली . परंतु तो पर्यंत सर्व पेंढा आगीच्या भक्ष्य स्थानी पडला होता . दुभती , गाभण जनावरे गोठ्यात असुन त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .याबाबत योगेश गुरव यांनी तलाठी यांना संपर्क करून नुकसानभरपाईसाठी पंचनामा करण्याची मागणी केली आहे .

अवकाळी पावसाने पेंढा महाग झाला आहे . त्यात कोणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असून जनावरांची उपासमार होणार आहे . – योगेश गुरव, तुपगाव – चौक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.