सिटी बेल | पेण | वार्ताहर |
गणपतीचे माहेरघर म्हणून जगात ओळख असलेल्या पेण मध्ये आज माघी गणेशोत्सव तालुक्यात ठिक ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील वडगाव येथील गणपती मंदिरात भाविकांनी सकाळ पासूनच दर्शन घेण्यास सुरुवात केली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने याठिकाणी भजन, कीर्तनचा यावेळी भाविकांनी लाभ घेतला तर यावेळी वडगाव ग्रामस्थांच्या वतीने नगराध्यक्षा प्रितम पाटील, युवा नेते ललित पाटील, नगरसेवक, अजय क्षिरसागर, सामाजिक कार्यकर्ते राजु पिचीका, प्रकाश झावरे यांच्यासह तालुक्यातील अनेकांचा सन्मान करण्यात आला.या माघी गणेशोत्सवाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्नेंहभोजन व अर्थीक मोलाचे सहकार्य केले.
यावेळी वडगाव ग्रामस्थ गणेश साळवी, सुनिल साळवी, कैलास पवार, संतोष शिगवण, विनायक पवार, संजय पवार, दिनेश साळवी, शगुन पाटील आदिंनी मेहनत घेतली.
Be First to Comment