नवी मुंबईतील ५० रिक्षाचालकांची मोफत कर्करोग तपासणी
सिटी बेल | नवी मुंबई |
नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरात ५० रिक्षाचालकांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. या शिबीरात तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, डायबिटीस, उच्च रक्तदाब तसेच दातांची तपासणी करण्यात आली तसेच तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन सोडण्यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे समुपदेशन करण्यात आले.
रोजच्या आहारात रसायनांचा अतिवापर, बदललेली जीवनशैली, वाढणारे वजन, गुटखा, तंबाखू, मद्याची वाढती व्यसनाधीनता या महत्त्वपूर्ण कारणांसह रोगाबद्दल असलेल्या जागरूतेचा अभाव यामुळे गेल्या दशकाच्या तुलनेत या दशकात कर्करोगाच्या संख्येत विलक्षण वाढ झाली. कॅन्सरबाबत जागृती वाढण्याची गरज असून प्रथम स्टेजमध्ये कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण अवघे १ ते २ टक्के आहे. ४ फेब्रुवारी जगभर जागतिक कॅन्सर प्रतिबंध दिन म्हणून साजरा होतो. या औचित्यावर कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी हे खास शिबीर आयोजित केले होते.
प्रतिवर्षी १० ते १२ लाख रुग्णांना कर्करोगाचे निदान होत आहे. तितकेच रुग्ण यामुळे दगावतात, भारतामध्ये कुठल्याही घडीला ४० लाख कर्करोगी आढळतात.
Be First to Comment