डॅा.सौ अदिती भागवत यांच्या सतर्कतेमुळे झाडाला मिळाले जीवदान
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहराजवळ असलेल्या एका भेंडीच्या झाडाला आज सकाळी अचानकपणे आग लागली होती. परंतु तेथून जात असलेल्या डॅा.सौ अदिती भागवत यांनी ते झाड पेटलेले बघून ताबडतोब अग्नीशमन दलाला फोन केल्याने घटनास्थळी अग्नीशमन दलाचे बंब पोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने त्या झाडाला जीवदान मिळाले आहे.
शहराजवळील पंचमुखी हनुमान मंदीराजवळील भारत हॅाटेलच्या समोर असलेल्या एका भेंडीच्या झाडाला आज सकाळी, दि. १ फेब्रू. २०२२ रोजी, आग लागली होती. यावेळी एक सतर्क नागरीक डॅा.सौ अदिती भागवत ह्या तेथून जात असताना त्यांनी ते झाड पेटलेले बघून ताबडतोब अग्नीशमन दलाला फोन केला.
दरम्यान काही ईतर सतर्क नागरीकही त्यांच्या परीने बाटलीतील पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, पण आग भडकू लागली व एक जीवंत हिरवेगार झाड असाह्यपणे आगीच्या भक्षस्थानी पडत होते. अग्नीशमन दल वेळेवर पोहोचले व त्यांनी सत्वर पाण्याचे फवारे मारून सदर आग विझवली. त्यामुळे सध्यातरी हे झाड बचावलेल्या स्थितीत असून डॉ.अदिती भागवत यांच्या सतर्कतेमुळे त्याला जीवदान मिळाले आहे.
Be First to Comment