Press "Enter" to skip to content

“श्री राधाकृष्णा” मंदिराची पायाभरणी

आळी आंबिवली डोंगरी येथे “श्री राधाकृष्णा” मंदिराचा पायाभरणी सोहळा उत्साहात

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

आळी आंबिवली मोहोपाडा येथील डोंगरी भागात मंदिर व्हावे यासाठी तेथील रहिवासी गेल्या वर्षांपासून प्रयत्नशील होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आळी आंबिवली मोहोपाडा डोंगरी भागात श्री राधाकृष्ण मंदिराचा पायाभरणी सोहळा उत्साहात करण्यात आला.

यावेळी महिला व बालकल्याण माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे व माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मंदिराच्या पायाभरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी सरपंच ताई पुंडलिक पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, मोहोपाडा ग्रामपंचायत माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे,उपसरपंच श्वेता संजय कांबळे, सदस्य अंजनी भोईर, ह. भ. प. वामन महाराज भोईर, ह. भ. प. अनंत महाराज कार्ले, ओबीसी सेल अध्यक्ष अरुण गायकवाड, मोहोपाडा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव अमित शहा, सल्लागार विलास ओसवाल, माजी सरपंच शशिकांत मुकादम, उद्योजक तुषार ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्याहस्ते श्रीफळ वाढवून पुजन करण्यात आले. यावेळी आळी आंबिवली मोहोपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.