Press "Enter" to skip to content

जिल्हात देविदास म्हात्रे प्रथम

रायगड जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर : जिल्हात देविदास म्हात्रे प्रथम

सिटी बेल | मनोज पाटील | पाणदिवे |

नेहरु युवा केंद्र – अलिबाग ( भारत सरकार ) महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान, पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था, उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन” वन संवर्धन काळाची गरज ” ह्या एकाच विषयावर आयोजित केलेल्या रायगड जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेचा निकाल आयोजकांच्या वतीने जाहिर करण्यात आला.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक- देविदास गणपत म्हात्रे, पेण द्वितीय क्रमांक- विद्या कुणाल श्रीश्रीमाळ, महाड आणि तृतीय क्रमांक अभिषेक शोभा सुरेश पाटील, पनवेल ह्या स्पर्धकांनी पटकावले तर उत्तेजनार्थ म्हणुन
नैनिता नरेश कर्णिक- मुरुड जंजिरा, अभय सुनिल पालकर- माणगाव, सायराबानू वजीर चौगुले- माणगाव, राजू सीताराम पातेरे- सुधागड आणि नयना देविदास लभडे- खोपोली, ह्या पाच स्पर्धकांची निवड परिक्षकांच्या वतीने करण्यात आली.

सर्व वयोगटासाठी खुली निबंध स्पर्धा असल्याने जिल्ह्यातुन दोनशेहुन अधिक निबंध स्पर्धक सहभागी होत स्पर्धेची चुरस आणि उत्कंठा वाढली. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना २६ जानेवारी पासुन सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात येतील अशी माहिती यावेळी रायगड भुषण मनोज पाटील आणि आयोजक किरण मढवी यांनी दिली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिक्षक खुप मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विद्याधर गोपिनाथ पाटील आणि शिक्षिका स्नेहल देवदत्त पाटील. पुढील काही दिवसातच विजेत्या स्पर्धकांचे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात येईल असे मत नेहरु युवा केंद्र -अलिबाग चे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.