Press "Enter" to skip to content

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल भाजप कार्यालयात अभिवादन

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनसंघाचे संस्थापक, थोर राष्ट्रीय नेते आणि शिक्षणतज्ञ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीयांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल येथील भाजप कार्यालयात अभिवादन कार्यक्रम पार पडला. 

यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, शंकर म्हात्रे, सुनिल पाटील, विनेश कदम, यतीन पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थितांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी, शिक्षण क्षेत्रातील विकासासाठी आणि राष्ट्रहितासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरव करत राष्ट्रसेवा आणि जनकल्याणासाठी समर्पित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.