डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने श्री.सदस्यांनी फुलवली वनराई
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षामध्ये खालापूर तालुक्यातील सर्वच ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आल्याने आज शेडवली फाटा येथे वनजागेच्या जागी लावण्यात वृक्ष संवर्धन हा कार्यक्रम हाती घेण्यात आले. या वृक्षांची स्वच्छता आणी संवर्धन करीत असल्याचे श्री सदस्यांनी सांगितले.
आज हे वृक्ष डोलाने उभे राहिले आहेत.वृक्षांची लागवड आणी संवर्धन बरोबर वृक्षांना औषधी फवारणी,खते, झाडांच्या मुळा जवळ माती देणे,वृक्षांच्या बाजूला वाढलेले गवत काढून गुरांपासून या वृक्षांचे संरक्षण व्हावे यासाठी झाडांभोवती कुंपन,तसेच तारेचे कुंपन घालणे.आदि कामे श्री सदस्य मनापासून करीत करीत आहे.
प्रत्येक सदस्य स्वताजवळ असलेली पदवी विसरून या कार्यासाठी हातभार लावत आहे.यामुळे या ठिकाणी सध्या वनराई फुलल्याचे चित्र पहायला मिळत आहे.वृक्ष लागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल जो ढासलेला आहे.तो अबाधित राहण्यास मदत होणार आहे.आज अनियमित पडणारा पाऊस याला एकमेव कारण म्हणजे वृक्षांची कत्तल यामुळे आगामी काळातील धोके ओळखता वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन हि काळाची गरज आहे.

यामुळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री सदस्यांनी पिंपळ ,निलगिरी कडूनिंब,तान्हन, करंज,अर्जुन,रीठा,सफकर्णी,कुंतजिवा,निंबारा,रेनट्री,वड,गुलमोहर ,ऑस्ट्रोलियन,सुबाबुल,बेहडा,या सारख्या वृक्षाची लागवड करण्यात आली होती. आज संवर्धन चा कार्यक्रम हाती घेण्यात आले.
वृक्षांची लागवड वनविभागाच्या जागेत करण्यात आली असून उन्हाळा,पावसाला, हिवाळा या तिन्ही ॠतू मध्ये श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली जात असून पावसाळ्यामध्ये वाढलेले गवत,झुडपे श्री सदस्य या साफ करून या ठिकाणी वृक्षांसाठी नविन संजीवनी दिली आहे.वृक्ष म्हणजे मानवाचे फुफ्फुस आहे.कारण वृक्ष नसल्याने मानवाला शुद्ध ऑक्शिजन कसे मिळणार असे मत स्वच्छता करातांनी श्री सदस्यांनी व्यक्त केले.








Be First to Comment