रायगड जिल्हा नियोजन समिती मार्फत आदिवासी वाड्यां-पाड्यांसाठी विशेष निधीची तरतूद करावी !
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
शासन निर्णयाप्रमाणे ज्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल भाग आहे, तसेच 2001 च्या लोकसंख्या विचारात घेऊन शासन निर्णयानुसार शासनाने निर्धारित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्र, माडा आणि मिनी माडा म्हणजेच टी एस पी या क्षेत्राकरिता महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता विशेष निधीची तरतूद केली जाते. परंतु रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी उपयोजना क्षेत्रांमध्ये समाविष्ट नसलेल्या आदिवासी वाड्या-पाड्या यांच्या सर्वांगिन विकासासाठी कोणत्याही प्रकारची विशेष निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
विशेषता ज्या आदिवासी वाड्या-पाड्या आदिवासी उपयोजन, माडा, मिनी माडा या क्षेत्रात समाविष्ट आहेत त्यांना आदिवासी विकास विभागामार्फत विशेष निधीची तरतूद केली असतांना देखील जिल्हा नियोजन निधीचा ही डबल लाभ मिळतो. परंतु ज्या आदिवासी वाड्या -पाड्या आदिवासी उपयोजना,माडा आणि मिनिमाडा क्षेत्रामध्ये समाविष्ट नाहीत त्यांना ना आदिवासी खात्याचा निधी ना जिल्हा नियोजनाचा विशेष निधी मिळत नाही.
सदरच्या वाड्या-पाड्या या आजपर्यंत सार्वजनिक विकासापासून वंचित राहिल्या आहेत म्हणून एका जिल्ह्यामध्ये राहणारा आदिवासी समाज हा एकच आहे, त्या समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ओ टी एस पी मध्ये असलेल्या वाड्यां- पाड्याचा समावेश उपयोजने मध्ये करा नाही तर जिल्हा नियोजन ना मार्फत विशेष राखीव निधीचा कोठा मिळाला पाहिजे तरच या आदिवासी वाड्या-पाड्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल.
पंरतु आजपर्यंत अशा प्रकारचो कुठलेही उपयोजना जिल्हा नियोजना मार्फत किंवा प्रशासन,शासना मार्फत करण्यात आलेली नाही म्हणून संघटनेची मागणी आहे की जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व आदिवासी वाड्या- पाड्या या आदिवासी उपयोजना, माडा ,मिनी माडा मध्ये समाविष्ट करा नाहीतर जिल्हा नियोजनामध्ये विशेष राखीव निधीची तरतूद करावी.ही विसंगती दूर केली तरच खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास होण्यास मदत होईल.
आदिवासी उपयोजने मध्ये समाविष्ठ करा नाहीतर समाविष्ठ नसलेल्या वाड्यांना-पाड्यांना जिल्हा नियोजनात विशेष राखीव निधीचा कोठा मिळण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा नियोजन समिती, तसेच आदिवासी विकास प्रकल्प- पेण यांच्याकडे करण्यात आलेले आहे हे निवेदन देताना आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे ,जिल्हा संघटनेचे सचिव हरेश वीर, खालापूर तालुका अध्यक्ष अंकुश वाघ, अलिबाग तालुका संघटनेचे सचिव काशिनाथ दरवडा आदी उपस्थित होते.








Be First to Comment