Press "Enter" to skip to content

रामदास शेवाळे प्रतिष्ठान चा उपक्रम

कळंबोली येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

सिटी बेल | पनवेल |

रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्या मार्फत बिमा काॅम्पलेक्स कळंबोली या ठिकाणी राजमाता जिजाऊसाहेब यांची 424 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन रामदास शेवाळे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.

रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच रामदास शेवाळे यांनी जिजाऊंच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. गेल्या दोन वर्षांपासून मॉं साहेब जिजाऊ जमोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे पहायला मिळत आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला.

या वेळी शंकर विरकर, संतोष सपकाळ, अरूण तरंगे, ओमकार शेवाळे तुकाराम सरक, महेश गोडसे, नितिन गुलदगड, संजय शेडगे, नारायण पिलाणे,निलेश दिसले, आनंद माने, निलेश टाकळकर, सुरेश देवाडिगा, प्रविण तावरे, आमृत तरंगे, ज्ञानेश्वर गावडे,दत्ता शिंदे, संदिप शिंदे, श्रीकांत कदम,सुर्यकांत गोडसे, तसेच बिमा व्यापारी संकुला मधील वाहतुकदार व्यापारी व रामदास शेवाळे प्रतिष्ठाण चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.