सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सोमवार पासून फ्रंट लाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या जेष्ठ नागरिकांना कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बुस्टर डोस सुरू करण्यात आला आहे.
संपूर्ण देशात कोरोना तथा ओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशाने कडक निर्बंध केले आहेत.कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत आरोग्य खात्याकडून दोन डोस पुर्ण झालेल्यांना कोविशिल्ड बूस्टर डोस सुरू करण्यात आले आहेत.यासाठी खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा हद्दीतील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड बुस्टर डोसचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा समन्वयक आरोग्यवर्धिंनी डॉ.सागर काटे,वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पवार व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. कोरोना तसेच ओमायक्रोनचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त झाल्याने महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध कडक करून शाळाही बंद केल्या आहेत. त्यात मास्क लावणे बंधन कारक केले असून मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार शासकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनाही दिले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन होत आहे.
Be First to Comment