सिटी बेल | उरण | अजय शिवकर |
जय हनुमान कलामंच कोंढरीचे नृत्य दिग्दर्शक तथा कलाकार मिलिंद भाऊ म्हाञे आणि राजेश पवार निर्मित आणि मिलिंद म्हात्रे लिखित व दिग्दर्शकीत आगामी अविरत या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन नुकताच कोंढरी गावचे आराध्य दैवत श्री हनुमान मंदिरात मिलिंद म्हात्रे यांचे आई वडील यांच्या शुभहस्ते कोविडचे सर्व नियम बाळगून पार पडला .

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करंजा मछ्चिमार सोसायटीचे माजी चेअरमन शिवदास नाखवा हे होते. तर प्रमुख उपस्थिती निर्माते राजेश पवार, चाणजेचे सरपंच मंगेश थळी, विद्यमान सदस्य अमितजी भगत, व्यंकटेश म्हाञे, माजी सदस्य महेश म्हाञे,सौ.पल्लवी ठाकूर, गीतकार विश्वास पाटील,कलाकार अरूण म्हाञे, आकाश भोईर, सुरेश चव्हाण,
हर्षवर्धन धामणकर, सोमनाथ ठाकूर, विनोद म्हाञे, दिपा ठाकूर ,विद्या ठाकूर तसेच मिलिंदजी म्हाञे यांचे सर्व शिष्यगण व त्यांचे आईवडील उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोंढरीसारख्या गावातून वडापावची गाडी चालवून उदरनिर्वाह करणारे आईवडीलांचा मुलगा एका सिनेमाची निर्मिती करतोय याबद्दल मिलिंदजी यांचे कौतुक आणि आगामी अविरत हा सिनेमा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध होवो या सदिछ्च्या दिल्या .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होळकर गुरूजी आणि चेतन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंदजी म्हाञे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हनुमान कलामंचने विशेष सहकार्य केले.








Be First to Comment