Press "Enter" to skip to content

वायु प्रदूषणामुळे श्वसन विकार

जेएसडब्ल्यू कंपनीच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक : जनार्दन नाईक यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सिटी बेल | याकुब सय्यद | नागोठणे |

रायगड जिल्ह्या पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू च्या विरोधात बळीराजा संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
डोलवी व गडब ग्रामपंचायत हद्दीमध्ये जेएसडब्ल्यू सारखा मोठा कारखाना असून सदर कारखान्यांचा कॉक एक हा प्रकल्प अत्यंत प्रदूषणकारी असून सदर प्लांट मधून बाहेर पडणारा धूर व वायु हा अत्यंत प्रदूषणकारी आहे. वायु प्रदूषणामुळे परिसरातील लोकांना श्वसन विकार, डोळ्यांचे विकार, कॅन्सर चा विकार, पित्ताशयाचे आजार, मुतखड्याचे आजार, रुदय विकार तसेच रक्तदाब असे वेगवेगळे आजार निर्माण झालेले आहेत. याला जबाबदार कोण ? असा सवाल बळीराजा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचे रायगड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख जनार्दन नाईक उर्फ डॉन यांनी उपस्थित केला आहे.

सदर कंपनीने मालाची ने-आण करण्यासाठी धरमतर जेटीवरून थेट कंपनीत रेल्वे लाईन वरून व महामार्गावरुन कन्व्हेअर बेल्ट बांधला आहे. सदर बेल्ट बांधण्यासाठी कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसवून मँग्रोजच्या संरक्षित क्षेत्रावर मातीचा भराव करून कांदळवनाची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली आहे. यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन जमिनीची मोठी धूप होत आहे. याबाबत कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मुंबई-गोवा हायवे पलीकडे तसेच हायवे च्या अलीकडे भातशेती असून शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे.

या जमिनीत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येऊन गडब डोलवी खाडीत निर्माण झालेले पाणी जाण्याचे नैसर्गिक स्रोत तसेच लगतच्या धरमतर खाडी मधुन निर्माण झालेले नैसर्गिक पाण्याचे स्रोत जाणाऱ्या ठिकाणी कंपनीने लोखंडी मिश्रित मातीचा भराव करून बंद केले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच शेतीमध्ये वारंवार पाणी जाऊन मोठे नुकसान होत आहे व ही परिस्थिती संबंधित कंपनीने निर्माण केली आहे. त्यामुळे आजूबाजूची शेती उद्ध्वस्त होत चाललेली आहे तसेच नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत बंद झालेले आहे.

याबाबत आपण प्रत्यक्ष गाव नकाशाप्रमाणे नैसर्गिक स्त्रोत पूर्ववत विनाअडथळा चालू ठेवून बाधित सर्व शेतकऱ्यांना वार्षिक नुकसानभरपाई मोबदला कंपनीमार्फत शेतकऱ्यांना मिळावा कंपनीत निर्माण होणारी लोह मिश्रित धुळ ही आजूबाजूची शेती व फळझाडांवर बसत असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

दहा किलोमीटर परिसरातील सर्व बाधित शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान भरपाई कोण देणार कंपनीमध्ये मोठ्याप्रमाणात परप्रांतीय कामगारांची तसेच हंगामी कामगारांची भरती केलेली असून सदर कामगारांची माहिती संबंधित कंपनीकडे व संबंधित पोलिस स्टेशन कडे कोणत्याही प्रकारची नोंद केली जात नसून त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे तसेच तसेच नोकरीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचे अत्यंत अल्प प्रमाणात भरती करून स्थानिकांवर कंपनी मोठा अन्याय करीत आहे. कंपनीतून मोठ्या प्रमाणात होणारे दृश्य पाणी हे लगतच्या धरमतर खाडी मध्ये सोडल्यामुळे हे पाणी आजूबाजू शेतीमध्ये जाऊन शेती उद्ध्वस्त होत चाललेली आहे तसेच मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे जलप्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात कंपनी नुकसान करीत आहे व मच्छीमारांवर उपासमारीचे संकट निर्माण झालेले आहेत.

पर्यावरण विषयक जनसुनावणी सामाजिक उपक्रम व शिबिरे कंपनीकडून राबविताना कंपनी स्थानिकांची डोळेझाक करून प्रदूषणाबाबत कोणत्याही प्रकारची जनजागृती विषयी माहिती देत नसून कंपनीचे अधिकारी स्थानिक विकासाची खोटी आश्वासने देत आहेत तसेच स्थानिक विकास कार्यक्रम वृक्षलागवड कार्यक्रम हे दहा किलोमीटर परिसरामध्ये नुकतीच राबवता कंपनीकडून पंचवीस ते तीस किलोमीटर नागोठणे जिते खारपाडा अशा परिसरामध्ये प्रदूषण आजूबाजूच्या परिसरात होत असल्यामुळे या कार्यक्रमाचा हा केवळ देखावा संबधित जनतेला दाखविला जातो.

कंपनीची मोठमोठी मालवाहू जहाजे ही स्थानिक छोट्या होड्यांची तसेच मच्छीमार जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत तसेच मालवाहू करणाऱ्या दहा हजार मुले खाडीच्या पाण्याच्या मोठ्या लाटा निर्माण झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीच्या संरक्षण बंधाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

यामुळे या बंधाऱ्यांना मोठमोठ्या खाडीत जाऊन खाडीचे खारे पाणी आजूबाजूच्या परिसरातील शेती मध्ये घुसून हजारो एकर शेतीचे मोठे नुकसान होत आहे. तरी याबाबत आपण कंपनीकडून उचित खुलासा मागवून पंधरा दिवसाच्या आत कारवाई करावी तसेच स्थानिक नागरिक व शेतकरी बांधव यांच्यावरील अन्याय दूर करावा व कॉक पोहन 1 2 व 3 हे प्रदूषणकारी प्रकल्प रद्द करावेत अन्यथा आम्हास आपल्या कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल त्याच्या होणाऱ्या परिणामाची सर्वश्री जबाबदारी ही शासनावर राहील असे जनार्धन जनार्दन नाईक यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात म्हंटले आहे. अशी माहिती त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.