Press "Enter" to skip to content

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा नेत्यांनी केले अभिवादन

पनवेल : संग्राम बंगला

प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल येथील संग्राम निवासस्थानी विनम्र अभिवादन करण्यात आले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपमहापौर प्रमिला पाटील, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, महापालिकेचे माजी सभागृहनेते विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, आदेश ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञतेने आदरांजली अर्पण केली. या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी दि. बा. पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे स्मरण केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.