Press "Enter" to skip to content

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता

श्री जोगेश्वरी मातेच्या मूळ स्थानावर आज शांती होम व महापूजेचे आयोजन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठणे गावाचे आराध्य दैवत, ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचे मूळ स्थान असलेले नागोठण्याचे पूर्वेकडील डोंगर (घरळी) येथे शांती होम व श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन आज सोमवार दि. १० जानेवारी रोजी करण्यात आले आहे. श्री जोगेश्वरी मातेच्या या मूळ स्थानावर होणाऱ्या शांती होम व महापूजेचे हे २३ वे वर्ष. आहे.

यानिमित्ताने सायंकाळी ४ ते ७ वा. महिलांसाठी हळदीकुंकू व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संत सेवा मंडळ, नागोठणे यांच्या हरिपाठ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तिमय कार्यक्रमास नागोठणे शहर व विभागातील भाविक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन ग्रामस्थ व महिला मंडळ खडकआळी, नागोठणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या कोरोनाच्या नियमावली नुसार साजरा करण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.