Press "Enter" to skip to content

बोकडविरा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शेखर पाटील

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण तालुक्यातील बोकडविरा ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली असून या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी ग्रामपंचायत सदस्य, गाव हक्क संघटना पॅनलचे उमेदवार शेखर भास्कर पाटील यांची निवड झाली आहे.

9 ग्रामपंचायत सदस्य व सरपंच असे एकूण 10 सदस्य ग्रामपंचायतीचे असून ग्रामसेवक अनिता पाटील, सरपंच मानसी पाटील यांच्या उपस्थितीत ही निवडणूक संपन्न झाली. बोकडविरा गावचे सुपुत्र, ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते, गाव हक्क संघटना पॅनलचे उमेदवार शेखर भास्कर पाटील यांची बोकडविरा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शेखर पाटील यांच्या चाहत्यांनी, मित्र वर्ग, नातेवाईकांनी त्यांना सोशल मीडिया द्वारे तर अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.