सिटी बेल | पेण | मंजुळा म्हात्रे |
जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्व माध्यमिक शाळांमध्ये लसीकरण युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. कोरोनाचा नविन विषाणू ओमायक्रोन च्या पाश्वभूमीवर १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना माध्यमिक शाळा शिहू येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली.या लसीकरण मोहिमेस विद्यार्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार दिनांक ३ जानेवारी पासून रायगड जिल्हातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुला -मुलींना लसीकरणाला सुरवात झाली. या वयोगटातील सर्व मुला – मुलींनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शिहू चे डॉ फुटाणे यांनी केले आहे. या वेळी उपस्थित माध्यमिक शाळा शिहू चे मुख्याध्यापक जे. जे. पाटील सर, सर्व शिक्षक कर्मचारी, डॉ. फुटाणे,एस. ए.शेलके सिस्टर, पाटील सिस्टर,आशा सेविका रजनी पाटील, शशिकला घासे ग्रीष्मा पाटील इत्यादी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
Be First to Comment