द्रोणागिरी युवा महोत्सवाच्या माध्यमातून महिला बनत आहेत आत्मनिर्भर
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सेझ मैदान बोकडविरा तालुका उरण येथे 21 व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे महिला विभाग प्रमुख वैशाली घरत यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आत्मनिर्भर, स्वावलंबी बनविणारे अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनविण्यासाठी महिला व मुलींसाठी खाद्य पदार्थ बनविण्याचे मोफत प्रशिक्षण यामध्ये चायनीज डिश बनविणे, केक बनविणे व त्यासोबत मेकअप प्रशिक्षण,इन्स्टंट पीठ बनविणे आदी वेगवेगळे प्रशिक्षण महिलांना व मुलींना मोफत देण्यात आले.
अश्विनी धोत्रे,जयश्री मोकल,सुरेखा निकम,सुषमा गायकवाड, देवयानी म्हात्रे आदींनी महिलांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे महिला स्वावलंबी बनून त्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचे व द्रोणागिरी युवा महोत्सवाच्या महिलांच्या विविध स्पर्धा उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.युवा म्होत्सवातील महिलांच्या विविध स्पर्धांना, उपक्रमांना महिलांचा, जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस महिलांची संख्या वाढतच चालली आहे.








Be First to Comment