Press "Enter" to skip to content

सिटी बेल “काव्य कट्टा”

सिंधुताई सपकाळ
…एक वादळ

मराठमोळी नववारीचा गौरव ,
करी दिल्लीचा दरबार !
सिंधुताई सपकाळ , नाव ,
तुफान प्रचंड धुंआधार !!

पाहिला स्वर्गातून देवांने ,
तो भव्य कौतुक सोहळा !
खळाळून वाहणारी सिंधूचा ,
अस्खलित आवेग आगळा !!

सदैव हसरा चेहरा ,
तो डोईवरचा पदर !
रूपया एवढ्या कुंकूत तेज ,
संघर्षाचा करपाश खांद्यावर !!

ममतेचा तो झरा अचानक ,
बांध सोडून धावला !
पोरके झाले अश्रूही ,
दुःखानेही आवंढा गिळला !!

उसवलेल्या काळजाने पुरवले ,
सर्वाना प्रेमाचे पांघरूण !
फाटका समाज पामर ,
नाही फेडू शकणार ऋण !!

©® मानसी म्हसकर, सुरत ( गुजरात )

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.