Press "Enter" to skip to content

काइदावरून स्मशानभूमी केली गायब

करोवा कंपनी विरोधात खानावले ग्रामस्थ आक्रमक, उपोषणाचा इशारा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

ग्रामीण भाग हा देशाचा विकासाचा महत्वाचा भाग असून प्रत्येक गावाच्या शेजारी आता सिमेंटची जंगले झाली आहेत .यात प्रत्येक शेतक-यांच्या जमिनी कवडी मोल भावाने घेतल्या गेलेल्या आहेत. यातच प्रत्येक शेतकऱ्यांची फसवणूक झाली याचाच प्रत्यय ग्रामस्थांना आला .

करोवा एल एल पी . कंपनी ( गोदरेज सिटी ) यांनी खानावले ग्रुप ग्रामपंचायतचे सर्व्हे नं . ४६ ( गुरांचा गवंड ) , सर्व्हे नं . ६४ ( स्मशानभूमी / दफनभूमी ) , सर्व्हे नं . ४५ स्मशानभूमी ही ग्रामपंचायत पोयंजे मौजे ” यांच्या ग्रामपंचायत हद्दीत १९९२ पासून ग्रामपंचायत खानावळे मध्ये वापरत असून करोवा एल एल पी . कंपनी ( गोदरेज सिटी ) यांनी आपल्या फायद्यासाठी कंपनीमधील कामगार व एक आदिवासी कर्मचारी यांस हाताशी घेऊन पंचनामा करुन घेतला परंतु त्याच ग्रामस्थांनी आमची जबरदस्तीने सह्या घेतल्याचे ग्रामपंचायतीला लेखी दिले आहे. यात त्या ग्रामस्थांना कुठलीही पूर्व परिस्थितीची कल्पना न देता त्यांचा एकप्रकारे वापर करुन खानावळे गावाची फसवणूक केली आहे .

हीच ती अस्तित्वात असलेली मात्र कागदावरून गायब केलेली स्मशानभूमी

सदर मंडळ अधिकारी आणि करोवा एल एल पी . कंपनी ( गोदरेज सिटी पनवेल ) यांनी खोटा पंचनामा देऊन मा . जिल्हाधिकारी , मा . उपविभाग अधिकारी व व ” मा.तहसिलदार यांची सुद्धा फसवणूक मंडळ अधिकारी , कंपनी प्रमुख व इतर ६ भागीदार यांनी करण्याचा प्रकार केला आहे . म्हणून या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून तहसिलदार कार्यालयावर मोर्चा , उपोषण , आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करणे असे निर्णय ग्रामस्थांच्या एक मताने झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आज गुरुवार दि.6 रोजी ग्रामस्थांनी गावच्या स्मशानभूमी परिसरात जमून गोदरेज विरोधात तीव्र निषेध दर्शविला. आम्हा ग्रामस्थांची फसवणूक झाली असून आम्ही शांत बसणार नाही असे खानावले ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.यावेळी सन 1992 चा ग्रामपंचायत स्मशानभूमी ठराव दाखवून सदर सव्हेंत स्मशानभूमी असतानाही ती सन सन 2019 च्या स्थळपाहणी अहवालात न दाखविता खोटे अहवाल बनविण्यात आले असा ग्रामस्थांनी आरोप केला.तर स्मशानभूमी अहवाल बनविताना पंच म्हणून सह्या घेतलेल्या ग्रामस्थांनी आमची फसवणूक केल्याचे लेखी ग्रामपंचायतीला दिले आहे.गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त काळ या खानावले सर्वेवर स्मशानभूमी शेजारी लहान मृतांकरिता थडगी असतानाही ‌दाखविण्यात आली नाही हा गैरव्यवहार आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.यावेळी ‌उपसरपंच मोहन लबडे , पोलीस पाटील संभाजी पाटील , तंटामुक्त अध्यक्ष काशिनाथ ठाकूर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .

आम्ही खानावले ग्रामस्थ एकजुटीने विरोध दर्शवित असून आमची फसवणूक झाली आहे.आम्ही न्यायासाठी सर्व ग्रामस्थ नाईलाजास्तव आंदोलन व उपोषण करणार — उपसरपंच मोहन लबडे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.