जिंदाल माऊंट लिटेरा स्कुल मधील १३८ विद्यार्थ्यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा लाभ
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
राज्य सरकारने राज्यातील १५ ते १८ वयोगटातील सर्व मुलांना कोविड लस देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. सद्यस्थितीत कोरोनाची वाढती संख्या पाहता हा निर्णय अतिशय फायदेशीर ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागोठण्याजवळील सुकेळी येथिल जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कुलमध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि.५ जाने.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. जिंदाल स्कुलच्या प्राचार्या श्रीमती.सविता शर्मा यांच्या हस्ते फीत कापून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिंदाल कंपनीचे जनसंपर्क अधिकारी के.के.पांडे, उपमुख्याध्यापिका बिजल अवस्थी, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक वंदन तांबोळी, जगदिश मोकल, जिंदाल रुग्णालयाचे व्यवस्थापक जय रमण नडार, स्कुलचे व्यवस्थापक अजय यादव, शिक्षक लोकेश लाडगे, विश्वकला नायर, परिचारीका सौ.प्रतिभा ताडकर ,आशा सेविका चितंनिका आमडोस्कर, तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या लसीकरणाच्या वेळी सर्व सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात आले.
स्कुल मधील सन २००७ व त्यापुर्वी जन्मवर्ष असलेल्या एकुण १३८ विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिनचे लसीकरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व स्कुलच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.
Be First to Comment