सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यात दशक्रिया विधीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण चिरनेर खाडी येथे उरण तालुक्यातून विवीध ठीकाणाहुन नागरिक येत असतात पण भोम गावात आत आल्या नंतर दोन मार्ग निघतात त्या मुळे नागरिकांना खूप त्रास होतो. त्यामुळे शिवप्रेमी युवा प्रतिष्ठानच्या युवा तरुणांनी नवीन वर्षा निमित्त दिशा फलक लाऊन नागरीकांना होत असलेला त्रास या पुढे होणार नाही याचा संकल्प करत दिशा फलक लावला.
या कार्यक्रमास जेष्ठ नागरीकांनी देखील सहकार्य करुन कार्यक्रमास हातभार लावला.यावेळी शिवधन पतपेढीचे चेअरमन गणेश म्हात्रे , चिरनेर ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्रीधर पाटील , चिरनेर ग्राम सदस्य धर्मेंद्र म्हात्रे , केअर ऑफ नेचर संस्थेचे कार्याध्यक्ष महेश पाटील, गोविंद आर्टचे चेअरमन अमोल गोठणकर,जनसागर पतसंस्थेचे संचालक सुभाष पाटील , नाट्य कलाकार चांगदेव जोशी , जेष्ठ नागरीक बाबुराव म्हात्रे , निकेतन नारंगीकर , विजय म्हात्रे, शिव प्रेमी युवा प्रतिष्ठाणचे सल्लागार प्रशांत पाटील,अध्यक्ष कु.करण नारंगीकर , उपाध्यक्ष नितेश पाटील, सदस्य अमित म्हात्रे,शैलेश खारपाटील,सिद्धार्थ नारंगीकर , शेखर नारंगीकर, अमूल म्हात्रे , प्रसाद पाटील, प्रवीण मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment