उरणकरांना हॉस्पिटल व मैदान देणार – पालकमंत्री आदीतीताई तटकरे
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असतानाच उरणकरांसाठी शासकीय हॉस्पिटल व सुसज्ज मैदान लवकरच उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी द्रोणागिरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीची दखल घेऊन ती मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याबद्दल पत्रकार संघाने पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांना धन्यवाद दिले.
उरणकरांचे हॉस्पिटलचे स्वप्न कधी पूर्ण होणार? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करीत उरण तालुका मराठी पत्रकार संघाने पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज त्यांनी जिल्हा स्तरीय २१ व्या द्रोणागिरी युवा क्रीडा महोत्सवाचे आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते उदघाटन प्रसंगी या वृत्ताची दखल घेतली, त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना त्यांनी द्रोणागिरी महोत्सव व केलेल्या नियोजनाचे कौतुक केले.
उरणच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटीबद्ध असून उरण तालुक्यात सुसज्ज असे शासकीय हॉस्पिटल त्वरित उभारण्यासाठी व सुसज्ज असे खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी सिडको, जेएनपीटी व संबंधित प्रशासन सोबत बैठका, पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविणार असल्याचे आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
विविध देशी विदेशी असे १३२ हुन अधिक स्पर्धांचा समावेश. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना द्रोणागिरी पुरस्कार देण्यात आला.
यानंतर हनुमान कोळीवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बोर्डचे उद्घाटन व गावाला भेट, दिघोडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. भार्गव पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, उरण-बेलापूर टॅक्सी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उरण चारफाटा येथील मासळी विक्रेत्यां महिलांनी पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडीत मासळी मार्केट बांधून देण्याची मागणी केली असता ती पूर्ण करण्याचे आश्वासन ही दिले. यानंतर उरण आंनद हॉटेल येथे अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, काँगेसचे सक्रिय पदाधिकारी डॉ मनीष पाटील, माजी जिप सदस्य वैजनाथ ठाकूर, तालुका अध्यक्ष मनोज भगत, आंनद भिंगार्डे, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, तसेच दिग्गज नेते, विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध व्यक्ती, सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.








Be First to Comment