Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

शहीद वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रविवार, दिनांक ०२ जानेवारी रोजी शिवसेना शहर शाखा माथेरान व समर्पण ब्लड बँक,घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे सकाळी १० वा. ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजीत करण्यात आले त्यास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

अनेक नागरिकांनी व रक्तदात्यांनी, सामाजिक बांधिलकी जपत स्वेच्छेने अन बहुसंख्येने उपस्थित राहुन ह्या महान कार्यास आपला हातभार लावून सामाजिक कर्तव्य निभवले त्याबद्दल शिवसेना , युवासेना, महिला आघाडीने सर्वांचे आभार मानले.

यावेळी माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद सावंत,वन समिती अध्यक्ष योगेश जाधव, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, माजी नगरसेविका सुषमा जाधव, सोनम दाभेकर, कीर्ती मोरे, ज्योती सोनावले,सरचिटणीस वसंत कदम, मनोहर रांजणे ,महत्त्वपपूर्ण कामासाठी सागर पाटील उपशहरप्रमुख, शिवसेना ,श्रेयस गायकवाड सचिव, युवासेना, निमेश मेहता युवाधिकारी, युवासेना, सचिन दाभेकर उपाध्यक्ष, क्षत्रिय मराठा समाज, माथेरान गौरंग वाघेला, अंकिता तोरणे,सुजाता कुंभार, उन्मेष दाभेकर, बंटी साबळे ,समीर पन्हाळकर
यांनी विशेष परिश्रम घेतले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमास नगरपरिषदेच्या सन्माननीय मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक सुरेखा भणगे आणि त्यांचे पती यांनी हजेरी लावून रक्तदान सुध्दा केले आहे हे आजवरच्या इथल्या प्रशासकीय कारकिर्दीत प्रथमच पहावयास मिळाले आहे त्यामुळे भणगे दांम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.