दांडफाटा येथे टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटनेकडून आरोग्य तपासणी शिबिर
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
ग्रामीण रुग्णालय चौक आणि वासांबे मोहोपाडा टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षानिमित्त पहिल्या दिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटनेच्या 59 रिक्षाचालकांनी आरोग्यविषयक सिबिसी,लिफिड प्रोफाईल,थायराॅईंड, हिमोग्लोबिन,एचआयव्हि आदी तपासणी करून घेतल्या.

धकाधकीच्या जीवनात रिक्षाचालक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी फुलचंद लोंढे यांनी प्रयत्न केले आहे.यावेळी फुलचंद लोंढे यांनी उपस्थित रिक्षाचालकांना एचआयव्हि एड्स व कोरोना यावर मार्गदर्शन केले.
यावेळी टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संदीप सुदाम मुंढे यांच्या मार्गदर्शनाने टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.यावेळी चौक आरोग्य केंद्राचे समुपदेशक अशोक लोंढे,लॅबचे प्रशांत, तृप्ती तांबडे, एलडब्ल्युएस पूनम सावंत,नरेश महाडिक, किरण पवार,विजय घाडगे,अशोक पवार यांच्यासह टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुलचंद लोंढे यांनी अथक परिश्रम घेतले.








Be First to Comment