Press "Enter" to skip to content

विनर्सचे माणुसकीचे देणे

जॉय ऑफ गिव्हिंग अँड शेरिंग कार्यक्रम साई मंदिर वहाळ येथे संपन्न

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

जॉय ऑफ गिव्हिंग अँड शेरिंग ..हे सत्र गेले चार वर्षे अविरतपणे प्रत्येक महीन्याच्या चाैथ्या शनिवारी संपन्न हाेत आहे.सदर सत्र हे मुंबई,नवी मुबंई, ठाणे,भिवंडी,पनवेल, रायगड,पुणे येथील वृध्दाश्रम, आनाथालय, आदिवासी पाडा तसेच समाजातील दुर्बलत घटकांसाठी मदतीचा हात म्हणुन विनर्स ट्रस्ट हे कार्य करत आहे.

या सामाजीक उपक्रमामागे विनर्स चे गुरुवर्य शशिकांत खामकर यांचे मार्गदर्शन आणि विचार आहेत.जर आपणसमाजाचे देणे लागताे,तर ते आपण गरजवंतापर्यन्त पाेहाेचुन त्यांना मदत करायला हवी हा ध्यास प्रत्येकानी घेतल तर समाज ,राज्य ,देश सक्षम हाेईल आणि देश समृद्ध हाेईल.

जॉय ऑफ गिव्हिंग च्या ह्या सामाजिक कार्यसाठी विनर्स परिवाराला प्रेमाने आणि आपल्या स्वभावने बांधुन ठेवले आहे ते म्हणजे विनर्सचे विश्वस्त गजेंद्र जुईकर यांनी. जुईकर यांनी सांगितले की “४५ सत्राचे नियाेजन करत असतांना प्रत्येक महीन्याला दाेन आयाेजक नेमुन त्याच्या मार्फत सामाजिक संस्था आणि समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पाेहाेचुन त्यांना जॉय ऑफ गिव्हिंग केली जाते. जॉय ऑफ गिव्हिंग हा वसा लॉकडाउन, कराेना आणि कर्फ्यू मधिल काळातही अविरत पणे सुरु हाेता. ह्या साठी सर्व विनर्स परिवाराचे सहकार्य लाभले”

नुकतेच वहाळ साई मंदिर येथे विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्भे जॉय ऑफ गीविंग अँड शेरिंग या 45 व्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी साई देवस्थान चे अध्यक्ष रविशेठ पाटील सौ. पार्वती पाटील तसेच रायगड जिल्हापरिषद शाळा वहाळ च्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती म्हात्रे मॅडम उपशिक्षक श्री पिंगळे सर आणि इतर शिक्षक उपस्थित होते.जॉय ऑफ गिविंग बद्दल विंनेर्स च्या सदस्यांनी जॉय ऑफ गिविंग विषयी मार्गदर्शन केले तसेच मेडिटेशन चे महत्व गुरुवर्य शशिकांत खामकर सर यांनी समजावून सांगितले व प्रात्यक्षिके करून घेतले.

पुढे आपल्या मनाेगत व्यक्त करताना खामकर सरांनी सांगीतले की “चागल्या माणसांकडे पैसा आलाच पाहीजे,तरच ताे समाजासाठी आणि देश निर्मिती साठी सत्कारणी लागेल. याप्रसंगी जॉय ऑफ गिविंग च्या माध्यमातून विद्यार्थींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनर्स चे विश्वस्त श्री गजेंद्र द्वारकानाथ जुईकर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.