Press "Enter" to skip to content

कराडी समाजाची दिनदर्शिका प्रकाशित

कराडी समाजाच्या दिनदर्शिकेचे महादेव बंडा यांच्या हस्ते प्रकाशन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

अखिल कराडी समाज महाराष्ट्र ही संघटना कराडी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून ही संघटना संपूर्ण भारतात कार्यरत आहे.1/1/2021 रोजी या संघटनेचे 21 वे वर्धापन दिन असून या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कराडी समाजाची दिनदर्शिका सण 2022 चे प्रकाशन अखिल कराडी समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव बंडा यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात, उत्साहात संपन्न झाले. अध्यक्ष महादेव बंडा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि 1/1/2022 रोजी सकाळी 11 वाजता कोट गावचे आराध्य दैवत श्री राघोबादेव मंदिर, कोटनाका उरण शहर येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महादेव बंडा, कोषाध्यक्ष मधुकर भगत, महाराष्ट्र सचिव विलास पाटील, मुंबई उपाध्यक्ष संतोष माजगावकर, उपाध्यक्ष मनोहर पाटील, पनवेल अध्यक्ष सूरदास गोवारी, उरण अध्यक्ष रमण कासकर,उरण उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील,बांधकाम सभापती उरण गणेश पाटील, उपाध्यक्ष रमेश धुमाळ, चौल विभाग मेघशाम झावरे, श्रीकांत भोईर, दत्ताराम पाटील, शांताराम पाटील, सुनील पाटील(पाणजे ),चौल विभाग अध्यक्ष -अविनाश भगत,ठाणे विभाग अध्यक्ष विजय मोहिते,खजिनदारश मधुकर भगत, सहखजिनदार प्रल्हादशेठ कासकर, कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष योगेश गोवारी आणि कराडी समाजाचे बंधु व भगिनी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.