नैना कडे खोपटे ग्रामपंचायत तर्फे ५४५ वैयक्तिक हरकती दाखल
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
सिडको मुख्य नियोजनकार (नैना) बेलापूर, नवी मुंबई यांच्या कार्यालयात जाऊन खोपटे नवनगर प्रकल्पास विरोध म्हणून ग्रूप ग्रामपंचायत बांधपाडा खोपटे व ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या तर्फे ५४५ वैयक्तीक हरकती दाखल करण्यात आले.
सदर प्रसंगी ग्रूप ग्रामपंचायत बांधपाडा सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्राम अध्यक्ष विश्वनाथ पाटील, पाणी कमिटी सभापती महेंद्र पाटील, संजय ठाकूर, राजेंद्र म्हात्रे, सत्यवान भगत, प्रशांत ठाकूर इ.ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच ज्या नागरिकांच्या हरकती नोंदवायच्या राहिल्या असतील अशा नागरिकांनी दिनांक ०५/०१/२०२२ पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन हरकती नोंदविण्या संदर्भात आवाहन करण्यात आले आहे.








Be First to Comment