माथेरान मधील विविध विकास कामांचे दुरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन व लोकार्पण
सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
माथेरान मध्ये आजवरच्या कार्यकाळात न भूतो न भविष्यती अशाप्रकारे सर्व प्रकारची महत्वकांक्षी विकास कामे सन २०१९ ते २०२१ या अवघ्या कमी कालावधीत मार्गी लागली असून अल्पावधीतच अजूनही काही कामे प्रगतीपथावर आहेत ती सुद्धा पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहेत.
नगरपरिषदेतील सर्व सन्माननीय सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपलेला असताना या सत्ताधारी गटाने शेवटपर्यंत या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत त्यामुळे त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
पूर्ण झालेल्या विकास कामांचे दुरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन व लोकार्पण विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या दुरदृश्य प्रणालीच्या अविस्मरणीय सोहळ्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (आयुक्त)एस. व्ही. आर. श्रीनिवास, बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर किशोरीताई पेडणेकर, कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख राजेश कुचिक, रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर,शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, तसेच नगरसेवक/नगरसेविका उपस्थित होत्या.

या सर्व विकास कामांसह मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावरील एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या वाहन पार्किंगचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.त्याचप्रमाणे अन्य विकास कामे पूर्ण करण्यासाठी यामध्ये प्रामुख्याने झाडांना गॅबियन वॉल आणि सात पॉईंटचे सुधारीकरण आणि सुशोभीकरण कामी जवळपास १०७ कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे यासाठीचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (आयुक्त)एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे सादर केला असून त्यांनी या कामासाठी सकारात्मक दुजोरा दिला असल्याने आगामी काळात हे गाव निश्चितपणे विकसित होण्याच्या दृष्टीने प्रगतीपथावर दिसत आहे.एमएमआरडीए च्या माध्यमातून होत असलेल्या कामांसाठी मागील नऊ वर्षांपासून कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.

ब्रिटिश राजवटीत अर्थातच १७० वर्षांपूर्वी माथेरान हे सुंदर पर्यटनस्थळ वसविले आहे.ततेव्हापासून ते आजमितीपर्यंत या छोट्याशा गावात कुणीही पर्यावरण पूरक विकास कामे पूर्ण केली नाहीत की वरीष्ठपातळीवरून भरीव निधी उपलब्ध करून घेतला.२०१६ मध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला दोन वर्षे खूपच अडचणीचा काळ ठरला आहे तद्नंतर कार्यतत्पर मुख्याधिकारी म्हणून रामदास कोकरे यांच्या दीड वर्षांच्या काळात अनेक विकास कामे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागली आहेत.








Be First to Comment