वर्षाच्या अखेरच्या दिवशी उरणच्या धुतुम गावची सत्ता पती – पत्नीच्या हाती
सिटी बेल | उरण | अजित पाटील |
उरणच्या धुतुम गावची सत्ता आज 2021 च्या शेवटच्या दिवशी कोणताही डामडौल न करता पती – पत्नीच्या हाती सोपविण्यात आल्याची दुर्मिळ घटना घडलेली आहे !! तालुक्यातील धुतुम गावच्या सरपंच पदावर सुमारे चार वर्षांपूर्वीच सौ. रेश्मा शरद ठाकूर या थेट जनतेतून निवडून आल्या आहेत तर आज त्यांचे पती शरद धावजी ठाकूर यांची उपसरपंच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे !
याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार आज धुतुम ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच सौ.रेश्मा शरद ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली, या निवडणुकीमध्ये धुतूम परिवर्तन आघाडीचा उमेदवार म्हणून शरद धावजी ठाकूर हे ६ विरुद्ध ४ अश्या फरकाने विजयी झाले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक मोरे साहेब यांनी पदभार सांभाळला. आज ठरल्या प्रमाणे आमच्या कारकिर्दीतील शेवटचा पाचवा उपसरपंच म्हणून शरद ठाकूर यांची निवड झाली असून धुतूम गावच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी पत्नी सरपंच आणि पती उपसरपंच झाल्याची नोंद झाली असल्याची माहिती शरद ठाकूर यांनी बोलतांना दिली आहे.

कुठलाही गाजा वाजा न करता फक्त शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमाला सरपंच सौ.रेश्मा शरद ठाकूर, माजी सरपंच धनाजी शेठ ठाकूर, माजी उपसरपंच सदानंद ठाकूर,माजी उपसरपंच वैशाली ताई पाटील, माजी उपसरपंच सौ आशा महेंद्र ठाकुर, माजी उपसरपंच सविता रुपेश ठाकूर, माजी उपसरपंच सुंदर पाटील, डी आर ठाकूर ज्येष्ठ नेते, श्याम भाई ठाकूर, तंटामुक्त अध्यक्ष दत्ता धावजी ठाकूर, प्रभाकर हरिश्चंद्र ठाकुर , दत्ता हरिश्चंद्र ठाकूर, राजेश शेठ ठाकूर, आर एन ठाकूर, दिलीप धावजी ठाकूर, विकास धावजी, निवास ठाकूर, जयेश घरत, जयेश राजाराम घरत, संतोष ठाकूर , तुकाराम ठाकूर, मेघनाथ ठाकूर, सुनील ठाकूर, प्रकाश परशुराम ठाकूर, महिंद्र ठाकूर, किशोर पाटील, नामदेव महादेव ठाकूर, प्रवीण पाटील, प्रदीप ठाकूर, प्रकाश पुंडलिक ठाकूर व माझे कुटुंबीय व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर अनेक मित्रांनी मोबाईल फोन करून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे शरद ठाकूर यांनी आभार मानले आहेत.








Be First to Comment