घारापुरी बेटावर आयओटी कंपनी यांच्या सहकार्याने वॉटर एटीएम चे उद्घाटन
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
जागतिक किर्तीच्या बेटावर येणाऱ्या पर्यटकांसाठी व येथील ग्रामस्थांसाठी उपयुक्त असे शेतबंदर पर्यटक जेटी पोच मार्गालगत जलशुद्धीकरण केंद्र युनिटचे उद्घाटन आज दिनांक २९ रोजी करण्यात आले.सदरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे येथील ग्रामस्थांना गावातच शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असुन बेटावर येणाऱ्या पर्यटकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
सदरच्या जलशुद्धीकरण युनिटसाठी ग्रामपंचायतीचे मार्फत आयओटी कंपनी कडे पाठपुरावा करण्यात आला होता.त्या अनुषंगाने घारापुरी हे जागतिक पर्यटनस्थल असल्याने आयओटी कंपनी कडून सदरच्या प्रकल्पासाठी त्वरित मान्यता देऊन सीएसआर फंडातुन सदरचा प्रकल्प राबविण्यात आला.

सदरच्या जलशुद्धीकरण युनिटचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन झाल्यानंतर घारापुरी येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे चालुक्य उपहारगृह येथे छोटेखानी स्वागत समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मार्गदर्शनपर भाषणात घारापुरी बेटावर आरोपी कंपनीला जल शुद्धीकरण युनिटसाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.तसेच भविष्यात पर्यटकांसाठी व ग्रामस्थांसाठी मोठा प्रकल्प राबविण्यात येईल असे आश्वासन दिले.तसेच नायब तहसीलदार श्री.नरेश पेढवी यांनी सदरच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे व सरपंच श्री बळीराम ठाकुर यांचे कौतुक केले.

सदरच्या जलशुद्धीकरण युनिटमुळे ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी गावातच मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यावेळी तहसील कार्यालय उरणचे नायब तहसीलदार नरेश पेढवी, आयओसीएलचे जनरल मॅनेजर चतुर्वेदी, आयओटीपीएचे हेड नवीन चंद्रा, आयओटीएलचे हेड अतुल खराटे, टर्मिनल इंचार्ज भरत रेड्डी, सीएसआर चे प्रमुख शिशिर कुमार,कार्पोरेट कम्युनिकेशनचे हेड योगेश दामले, ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे,सदस्य भरत पाटील, मंगेश आवटे, सदस्य सौ.शुभांगी मायने, सौ. मीना भोईर, पदाधिकारी मुकेश भोईर,अनंत घरत, ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment