Press "Enter" to skip to content

तहसीलदार व चाणजेतील शेतकऱ्यांनी केली बाधित स्थळाची प्रत्यक्ष पाहणी

चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आमरण उपोषण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

मौजे चाणजे ता.उरण येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात शिरणारे समुद्राचे पाणी थांबविण्यासाठी द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर असलेले साकवचे फ्लॅप गेट कायमस्वरूपी ठेवण्यासाठी तसेच करंजा टर्मिनल कंपनीकडून होत असलेली बेकायदेशीर जड वाहतूक थांबवण्यासाठी चाणजे शेतकरी संघर्ष समितीने अनेकवेळा मागणी केली त्यासाठी अनेक आंदोलने, उपोषणे, कायदेशीर पत्रव्यवहार केले पण शासन लक्ष देत नव्हते.शेवटी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी बाधित स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. नंतर तहसीलदार यांच्या विनंती नुसार बाधित शेतकरी व शासकीय अधिकारी यांची तहसीलदार कार्यालयात बैठक संपन्न झाली.

तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,पर्यावरण प्रेमी नंदकुमार पवार, सिडकोचे अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासमोर चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे व सदस्य निशिकांत म्हात्रे,कृष्णा पाटील, मंगेश म्हात्रे,अनिकेत ठाकूर, आमरण उपोषणकर्त्या हर्षला म्हात्रे व अन्य शेतकऱ्यांद्वारे मौजे चाणजे येथील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या मांडण्यात आल्या.

तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,पर्यावरण प्रेमी नंदकुमार पवार, सिडकोचे अधिकारी प्रमोद पाटील यांना चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्याद्वारे येथील गंभीर समस्या मांडण्यात आल्या व जाब विचारण्यात आला.त्या अनुषंगाने लवकरात लवकर 100% फ्लॅप गेट लावण्यात यावे तसेच बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या करंजा टर्मिनलवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा स्थगित केलेले आमरण उपोषण तहसील कार्यालया समोर करण्यात येईल असे इशारा चाणजे शेतकरी संघर्ष समिती तर्फे प्रशासनाला देण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.