Press "Enter" to skip to content

झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश

कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या व ३५% भाजलेल्या १३ वर्षाच्या मुलीवर झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

सिटी बेल | मुंबई |

मधुमेह-उच्च रक्तदाब, रक्ताचा कर्करोग तसेच मेंदूची सर्जरी झालेल्या व ३५ टक्के भाजलेल्या एका मुलीचे प्राण वाचविण्यात मुंबईतील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. घाटकोपर येथे राहणारी १३ वर्षांची ( वसुधा ) नाव बदलले आहे, घरामध्ये काम करत असताना ३५ टक्के भाजली होती.

वसुधा हिला आरोग्याच्या खूप तक्रारी होत्या, तिच्यावर रक्ताच्या कर्करोगाचे उपचार सुरु होते तसेच तिला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा सुद्धा त्रास होता अशातच ती भाजल्यामुळे तिच्यावर आधुनिक उपचार करणे फारच जिकरीचे काम होते परंतु झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हे आवाहन लीलया पेलले. शल्यचिकित्सक डॉ हेमंत पटेल व डॉ. उर्वी महेश्वरी यांनी पहिल्या दिवसापासून वसुधावर लक्ष केंदित केले होते .

याविषयी माहिती देताना डॉ हेमंत पटेल सांगतात तिला आधीच मधुमेह, रक्तदाब आणि ब्लड कॅन्सरचा त्रास असल्याने, केमोथेरपी आणि इन्सुलिन घेतल्याने तिला तीव्र वेदना होत होत्या. यापूर्वी तिच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. तिचा इतिहास पाहता, तिच्यावर उपचार करणे हे एक आव्हान होते व हे आव्हान आम्ही स्वीकारून आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तिच्यावर उपचार सुरू केले. जळलेल्या जखमेवर उपचार करण्यात आले ,आणि दररोज मलमपट्टी केली गेली. हिमोग्लोबिन कमी असल्याने तिला रक्त चढवण्यात आले. सेप्टिसिमियामुळे तिच्या प्लेटलेट्स देखील कमी होत्या ज्यावर शेवटी उच्च प्रतिजैविकांनी उपचार केले गेले. आमच्याकडे ती १० दिवस ऍडमिट होती या काळात आमच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाने निर्जंतुकीकरणाची पूर्ण काळजी घेतल्याने वसुधा पूर्णपणे बरी झाली तिच्या रक्तातील साखर आणि रक्तदाब आणि रुग्णाच्या सामान्य स्थितीची काळजी डॉ. उर्वी महेश्वरी घेत होत्या.

या मुलीवर यशस्वी उपचार केल्यानंतर, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलने एक समर्पित बर्न केअर युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला. बर्न केअर युनिटबद्दल अधिक माहिती देताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बिझनेस हेड आशिष शर्मा, म्हणाले, “ हे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक प्रकरण होते आणि आम्ही तिच्यावर यशस्वी उपचार केले आणि आम्हाला जाणवले की बर्न केअर युनिट ही काळाची गरज आहे कारण . मुंबई उपनगरात खाजगी हॉस्पिटलमध्ये समर्पित बर्न युनिट नाही त्यामुळे उपनगरातील जळालेल्या रुग्णांना ऐरोली-नॅशनल बर्न सेंटर येथे हलवावे लागते त्यामुळे या रुग्णांच्या कुटुंबियांना त्रास होतो. जळालेल्या रुग्णांवर ताबडतोब उपचार करणे आवश्यक असते कारण जळलेल्या प्रकरणांमध्ये संसर्गाची पातळी खूप जास्त असते, त्यामुळे आमचे रुग्णालय एलबीएस रोडवर प्राइम लोकेशनवर स्थित आहे जेथे मुलुंड ते कुर्ला व अंधेरी ते पवई येथील रुग्ण १० मिनिटांत पोहोचू शकतात.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.